बॉलीवूड ची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोपडा आणि हंड्सम हंक सलमान खान ह्यांनी भलेही गेली 9 वर्षे सोबत काम केलेले नाही. तरीही एवढ्या वर्षांनंतर ह्या दोघांचे नाव सोबत घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वीच घोषित झालेली व्हरायटी यादी मध्ये सलमान आणि प्रियांका चे नाव 500 प्रभावशाली व्यक्तींमध्ये सामील करण्यात आले आहे. ह्या यादी मध्ये त्यांच्यासोबत अजून दहा भारतीय व्यक्ती आहेत. व्हरायटी एक पब्लिशिंग वेबसाईट आहे जी इंटरटेनमेंट इंडस्ट्री शी संबंधित 500 प्रभावशाली व्यक्तींची यादी बनवते ज्यांनी 2 ट्रीलीयन डॉलर चा व्यवसाय केला असेल. व्हरायटी ने ट्विट करून लिहिले आहे कि शाहरुख खान आली आमीर खान व्यतिरिक्त अजून एक अभिनेता सलमान खानच आहे जो अनेक वर्षांपासून बॉलीवूड वर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews